पायाभूत चाचणी शेकडेवारी व श्रेणी

*पायाभूत चाचणी शेकडेवारी काढण्याची सोपी पद्धत*
✍🏾✍🏾✍🏾✍🏾✍🏾✍🏾✍🏾✍🏾


👉🏿 *वर्गाचे शेकडा प्रमाण*

मराठी व गणित दोन्हीचे वेगवेगळे खालील सूत्राने काढावे.

सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज ×100
  --------------------------------------------
   वर्गाचा पट × चाचणीचे कमाल गुण

उदा. माझ्या शाळेचा 3 री चा पट 12 आहे.
12  विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांची बेरीज 340 आहे. 3 री साठी चाचणीचे कमाल गुण 40 आहेत.

340 × 100
------------------
12 × 40

   34000
 = -----------
    480

= 70.83

➖➖➖

👉🏿 *शाळेचे शेकडा प्रमाण*

विषयनिहाय खालील प्रमाणे काढावे.

सर्व वर्गांच्या शेकडा प्रमाणाची सरासरी काढावी.

उदा. 4 थी पर्यंत वर्ग असलेल्या शाळेत
एका शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण

2 री   - 72%
3 री   - 85.5%
4 थी  - 91%


शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण =

72 + 85.5 + 91
------------------------
        3

=    82.83

असेच गणित विषयासाठी करावे.


शाळेचे अंतिम शेकडा प्रमाण मराठी व गणित विषयाची सरासरी काढून ठरवावे.

मराठी शे. प्रमाण + गणित शे. प्रमाण
----------------------------------------------

                        2

उदा.
गणित विषयाचे शेकडा प्रमाण 92.5 मानू.


82.83 + 92.5
---------------------
          2

= 87.66%

*आता शाळेची श्रेणी खालील प्रमाणे काढावी.*

81 ते 100   - अ
61 ते 80     - ब
41 ते 60     - क
0   ते 40     - ड

👉🏿 (पाहा: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र GR पान नं. 10 )
➖➖➖➖➖➖➖➖
                       

                            संकलन
                         दिपक पवार
              जि. प. प्राथ. शाळा पोहेगाव मूले


No comments:

Post a Comment